महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि विश्व युवक केन्द्र यांच्या संयुक्त विद्यमाने संगोस्ठी पोस्टर स्पर्धा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि विश्व युवक केन्द्र यांच्या  संयुक्त विद्यमाने संगोस्ठी पोस्टर स्पर्धा  आणि  रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि विश्व युवक केन्द्र यांच्या संयुक्त विद्यमाने संगोस्ठी पोस्टर स्पर्धा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले.

नागपूर - शहरातील जवाहरलाल नेहरू कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाडी येथे दि. 26 फेब्रुवारीच्या दिवशी महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि विश्व युवक केन्द्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिवसाच्या औचित्य साधून व त्याअनुषंगाने संगोस्ठी पोस्टर स्पर्धा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले .

तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ .विजया वंजारी पोलीस निरीक्षक( बर्डी पोलीस स्टेशन-नागपूर ) असून यांनी आपल्या भाषणातून आजच्या डिजिटल आधुनिक युगात सायबर क्राईम कसे घडतात तसेच महिलांवर होणारे अत्याचार कशाप्रकारे होते आणि त्याकरिता कोणते कलमांतर्गत गुन्हा नोंद होतात व होणारी कारवाईबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या बदलत्या युगात समाजात महिलांनी कशाप्रकारे सशक्त , जागरूक व निर्भयपणे जीवन जगायचे ह्या विषयांवरसुद्धा विजय वंजारी यांनी मार्गदर्शन दिले .

यावेळी सौ बबिता धुर्वे सामाजिक कार्यकर्ता ,सौ राणी कळमकर सपोर्टपर्सन कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन नवी दिल्ली , सौ सुनयना खाडे आर्टिस्ट , सौ शीतल पाटील संस्थापक महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर , महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ संजय टेकाडे, ( आय.क्यू.ए.सी.) समन्वयक डॉ नरेंद्र घारड मराठी विभागप्रमुख , कार्यक्रमांचे आयोजक डॉ कल्पना बोरकर , कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिषा भातकुलकर (प्राणी शास्त्र विभाग) प्रमुख यांनी केले.

 सदर कार्यक्रमानिमित्त महिला सशक्तीकरण ह्या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली . या मध्ये कु. साक्षी धांडे प्रथम क्रमांकावर तर . कु.आकांशा कारसर्पे द्वितीय क्रमांक आणि कु .शुभांगी मेश्राम यांनी तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली यामुळे त्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

संचालन डॉ शीतल बोन्डे (राज्य शास्त्र विभाग) यांनी व आभार प्रदर्शन डॉ कल्पना बोरकर यांनी केले .कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.