*' भरधाव मोटारसायकलवरून विनयभंग करणा - या रोडरोमीओ ला ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा*

*' भरधाव मोटारसायकलवरून विनयभंग करणा - या रोडरोमीओ ला ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा*

 अहमदनगर : आरोपी नामे मिनीनाथ दिलीप चव्हाण , वय - २४ वर्षे , रा . जीएसपी . इंम्पोरीयम अपार्टमेंट , नाना चौक तपोवन रोड , अहमदनगर याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही गंगा उदयान रोडने तिच्या भावासोबत सायकलवरून घरी जात असताना , तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३५४ , ३५४ ( अ ) तसेच लहान मुलांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा २०१२ कलम ८ नुसार दोषी धरून आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व रुपये १,००० / - दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली *. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले .* 

घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक ११.०८.२०२१ रोजी पिडीत मुलगी ही संध्याकाळी ७ वाजता तिचा लहान भावासोबत क्लासवरून घरी येत होती . दोघे गंगा उदयानच्या बाजूला पंकज कॉलनीकडे जाणा - या रस्त्यावरून घराजवळ पोहचले असता , आरोपी मिनीनाथ दिलीप चव्हाण हा त्याचे मोटार सायकलवरून पाठीमागून पुढे गेला व थोडा पुढे जावून पिडीत मुलीला पाहून त्याने त्याची मोटारसायकल वळून पुन्हा मागे आला . घटना ठिकाणी अंधार असल्याचा तसेच पिडीत मुलगी व तिच्या भावासोबत दुसरी मोठी कोणी व्यक्ती नसल्याचे पाहून आरोपीने पिडीत मुलगी हिची उजव्या बाजुची छाती दाबली . त्यामुळे पिडीत मुलगी हिने घाबरून जोराने पागल अशी ओरडली . घटनेनंतर आरोपी त्याची मोटारसायकल भरधाव वेगाने घेवून पळून गेला . सदरची घटना पिडीत मुलीने घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितली . त्यानंतर पिडीत मुलगी व तिचे वडील व काका यांनी आरोपीचा परिसरात शोध घेतला असता , आरोपी गंगा उद्यान जवळ त्याच्या मोटारसायकलसोबत सापडला . पिडीत मुलीच्या घरच्यांनी व जमलेल्या इतर लोकांनी आरोपीस पकडून तोफखाना पोलिस स्टेशनला घेवून गेले . सदर बाबत पिडीत मुलीने तोफखाना पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दिली . घटनेचा संपूर्ण तपास सहा . पो.नि. रविंद्र पिंगळे यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक तसेच महानगर पालिका यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवादाचे वेळी मे . कोर्टाचे निदर्शनास आणून दिले की , *सदयाच्या काळामध्ये रहदारी असलेल्या महामार्गांवर भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून महिलांच्या गळयातील मंगळसुत्र वगैरे आदी मौल्यवान वस्तु जोरात ओढून पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत . सदरच्या घटना या वरवर चोरीच्या दिसत असल्यातरी या घटनेमध्ये पिडीत महिला या गंभीररित्या जखमी होवून मयत देखील झालेल्या आहेत . या केसमध्ये जर आरोपीस निर्दोष मुक्त केले तर , अशा घटनांमध्ये वाढ होईल . तसेच समाजातील चैन स्नॅचींग करणा - या घटनामध्ये वाढ व आरोपींचे मनोधैर्ये वाढेल याचा समाजावर अतिशय वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सदरची घटनाही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे . घटनेमुळे पिडीत मुलगी हिचे मनावर अतिशय गंभीर परिणाम झालेला आहे* असा युक्तीवाद केला . सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ यांनी सहकार्य केले . 

अहमदनगर 

ता . १७/१२/२०२२ 

 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )

 विशेष सरकारी वकील , अहमदनगर .

 मो . ९ ८५०८६०४११,

८२०८ ९९ ६७ ९ ५