कर्हेटाकळी गावातील लिफ्ट कर्जामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. संदिपानजी भुमरे यांना दिले निवेदन.
क-हेटाकळी गावातील लिफ्ट कर्जामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री मा संदिपानजी भुमरे यांना दिले निवेदन
शेवगाव तालुक्यामध्ये क-हेटाकळी येथे सण 1987-1988 मध्ये यशवंत उपसा जलसिंचन योजना नावाने लिफ्ट झालेले असून सण 1991-1992 मध्ये सदर योजना बंद पडली असून आजही बंद आहे परंतु आज रोजी 80 ते 90 शेतकऱ्यांकडे सदर योजनेचे मुद्दल 46.00 लाख रुपये.ब त्यावरील अंदाजे व्याज 2 कोटी 10 लाख आहे. तसेच वरील विषयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीतील ऊस स्वतःच्या नावावर पाठवता येत नाही तसेच नवीन कर्ज उपलब्ध होत नाही आणि 7/12 उताऱ्यावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. त्यामुळे शेतकरी हतबल होत आहे . निवेदनात म्हटले आहे कर्ज वसुलीसाठी सोसायटी वारो वार नोटीस पाठवून शेतकऱ्यावर वसुलीची सांगती तलवार ठेवू पहात आहे आपले यशवंत उपसा जलसिंचन योजना ही ज्ञानेश्वर सह. साखर कारखाना भेंडा कारखान्याचे कार्यान्वित केली होती या लिफ्टबरोबर सुरू असलेले शेजारील गावातील तीन लिफ्ट योजनेची कर्जमाफी झालेली आहे त्यांचे नाव 1) एकनाथ सह उपसा सिंचन योजना 2) दधेश्वर उपसा सिंचन योजना देखील कर्जमाफी झालेली आहे निवेदन दिले आहे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार संदिपानजी भुमरे यांची मुंबई मंत्रालयात सदिच्छ भेट घेऊन यशवंत जलसिंचन कर्हेटाकळी सोसायटी अंतगर्त केलेल्या लिफ्ट पाईपलाईनचे कर्ज माफी करण्याबाबत सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवण्यात आले व लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ अशी हमी मंत्रिमहोदयांनी दिली. तसेच सोबत वि.का.से. सोसायटी चेअरमन लक्ष्मण गायके. उपसरपंच विनायक गटकळ. प्रशांत गटकळ . सतीश गायके. बाबासाहेब काटे. दिपक वीर. असंख्य शेतकरी उपस्थित होते.