राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत
मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचा पुढाकार --सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार ! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय !!
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशलींचे विनयमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी पुढाकार घेतला.
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होतो.. त्यामुळे दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून त्यावर उपाययोजना करण्याचीही सातत्याने मागणीही होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.
.