बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाकडून अजून दोन वेठबिगार इसमांची मुक्तता, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकूण 19 वेठबिगार मुक्त .

बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाकडून अजून दोन वेठबिगार इसमांची मुक्तता, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकूण 19 वेठबिगार मुक्त .

बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाकडून अजून दोन वेठबिगार इसमांची मुक्तता-ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकूण 19 वेठबिगार मुक्त .

 

 

Delhi91 News ची खास बातमी .

 

 

      बेलवंडी पोलीस स्टेशन च्या पथकाने आज पहाटे गुरन 674 /23भा द वि कलम 367,370 वेठबिगारी अधिनियम कलम 16 अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास करताना दालखुश मुकिंदा काळे या अटक आरोपीकडून त्याने लपवून ठेवलेला अजून एक वेटबिगार (नाव तुफान वय 30अंदाजे,शारीरिक व मानसिक कुचंबना झाल्याने पूर्ण नाव गाव सांगता येत नाही) यास मुक्त करण्यात आले.तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मानवी तस्करी तथा वेठ बिगारी बाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोहेकॉ नंदू पठारे, अजिनाथ खेडकर,मपोना सुरेखा वलवे,पोकॉ. कैलास शिपणकर,रामदास भांडवलकर विनोद पवार,सतीश शिंदे,संदीप दिवटे यांनी कोळगाव वाघदरा शिवार येथून आरोपी नामे विशाल उपरलाल काळे याचे ताब्यातून इसम नामे शिवाजी (वय अंदाजे ३५ वर्षे, शारीरिक व मानसिक कुचंबना झाल्याने पूर्ण नाव गाव सांगता येत नाही) याची सुटका केली त्यावेळी आरोपी विशाल उपरलाल काळे लगतच्या लिबुंनीच्या शेतात पळून गेला. सदर बाबत गुरन 674 /23 भा द वि कलम 367,370 वेठबिगारी अधिनियम कलम 16 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ.नंदू पठारे करत आहे.

 

             अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे संकल्पनेतील ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेलवंडी पोलीस स्टेशनने एकूण मानवी तस्करी केलेल्या 19 वेठबिगार इसमांची मुक्तता केली असून 12 गुन्हे दाखल केलेले आहेत.सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात संजय ठेंगे यांचे नेतृत्वात करण्यात आली आहे.

 

        बेलवंडी पोलीस स्टेशन द्वारे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या आजूबाजूला अशाप्रकारे अनोळखी इसमांना आणून त्यांच्यावर अत्याचार करून,अर्धवट उपाशी ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने विविध कामे करून घेतली जात असल्यास/ भीक मागितली जात असल्यास सदर माहिती पोलिसांना पुरवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.