*खनिज प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र राज्यातील प्रथम प्रदर्शनीय प्रकल्पांअतर्ग लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे व शेळी गट ना वाटप*

*खनिज प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र राज्यातील प्रथम प्रदर्शनी प्रकल्पांअतर्गत लाभार्थ्यांना दुधाळ जनावरेशेळी गट वाटप*                                                                         BPS live news(नागपूर सुनील सोमकुंवर)                      नागपूर:-ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचा विविध योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन राज्याचे 

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे । ते आज नागपुरातील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरात आयोजित खनिज प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र राज्यातील प्रथम पथदर्शी प्रकल्प अंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळू जनावरे व शेळीगट वाटप लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते । यावेळी नागपुर जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य , पशु विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते । यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांचा हस्ते 90% अनुदानावर शेतकऱ्यांना दुधाळू गायी आणि शेळ्यांचे वाटप करण्यात आले । या गायी आणि शेळ्या अनुदानावर घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसत होते । शेतकऱ्यांना आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करायची असेल तर दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालन व्यवसाय करणे आवश्यक असून लवकरच विदर्भातुन शेळ्या विदेशात पाठविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे सुनील केदार यांनी यावेळी सांगितले । नागपूरातुन शेळ्यांचे 12 कंटेनर परदेशात पाठविण्याची क्षमता असून या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सुबकता निर्माण होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले । जे लोक या कार्याला विरोध करतील त्यांची समजूत काढण्यात येईल असेही केदार यांनी सांगितले