राहुरी खुर्द येथे डॉ . विखे पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी दिन केला उत्साहात साजरा .
राहुरी खुर्द :
ग्रामपंचायत कार्यालय राहुरी खुर्द येथे दि.०१/०७/२०२४ रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला.व कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना कृषी दिन विषयी माहिती देण्यात आली व वृक्ष लागवड करण्यात आली येथे याप्रसंगी सरपंच सौ.मालती अंबादास साखरे, ग्रामविकास अधिकारी चव्हाण भाऊसाहेब व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक समवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषीदूत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी येथे आले आहेत. डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कार्यक्रम समन्वयक प्रा.किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत सुरज टेंगले, गणेश झरेकर, विशाल वैरागर, हर्षद राठोड, उन्नती पवार हे थेट बांधावन जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील मातीपरीक्षण, फळबाग व्यवस्थापन, आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस.बी. राऊत प्रा. डॉ. एच.एल. शिरसाठ, प्रा. डॉ. बी.व्ही गायकवाड, प्रा. पी. सी. ठोंबरे आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील सर्व विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.