*शेतकऱ्यांना १८,६९०हजर कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषी विद्यापीठात संपन्न पंतप्रधान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांचा योग्य सन्मान.*

*शेतकऱ्यांना १८,६९०हजर कोटी  प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषी विद्यापीठात संपन्न पंतप्रधान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांचा योग्य सन्मान.*

*पंतप्रधान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांचा योग्य सन्मान*

*- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे*

*राहुरी विद्यापीठ, दि. 30 ऑक्टोबर, 2026*

 गुजरात येथील बनासकांठा येथून देशातील 9.34 कोटीं शेतकऱ्यांना 18,690 कोटी रुपयांचा पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा 24 वा हप्ता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी वितरित केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपन विद्यापीठात शेतकरी, शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले.

 याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, कृषि विस्तार शिक्षणाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मृणाल आजोतीकर, जनसंपर्क अधिकारी तथा प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. संजय पाटोळे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोहर धादवड उपस्थित होते. 

 याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भारत सरकार प्रयत्नशील असून पीएम किसानचा 24 वा हप्ता आज मा.पंतप्रधानांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. यामध्ये जवळजवळ 9.34 कोटी शेतकऱ्यांना 18,690 कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे. यावेळी डॉ. प्रशांत बोडके यांनी नैसर्गिक शेती पध्दती, सेंद्रिय शेतीतील एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले तर आभार डॉ. मृणाल अजोतीकर यांनी मानले. याप्रसंगी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच तांभेरे व कानडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.