संगमनेर येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 25 गोवंशीय जनावरांची सुटका ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संगमनेर येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 25 गोवंशीय जनावरांची सुटका ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

*संगमनेर येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवलेल्या 25 गोवंशीय जनावरांची सुटका* 

*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

 

जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, अमृत आढाव, सतीष भवर, विशाल तनपुरे व योगेश कर्डीले अशांना अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून रवाना केले. 

दिनांक 28/10/2026 रोजी तपास पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, लाला रफीक कुरेशी, जहीर अन्वर कुरेशी व शमसू कुरेशी सर्व रा.संगमनेर अशांनी जमजम कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळ, मोना प्लॉट येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधुन ठेवली आहेत. पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे गोवंशीय जनावरे बांधलेली मिळून आल्याने छापा टाकुन 1) नदीम रेहमान कुरेशी, वय 39, रा. संगमनेर, 2) राजमोहम्मद आरिफ सय्यद, वय 40, रा. संगमनेर यांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे जनावरांचे मालकीबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची जनावरे ही 3) लाला रफीक कुरेशी (फरार) 4) जहीर अन्वर कुरेशी (फरार) व 5) शमसू कुरेशी (फरार) यांचे मालकीची असल्याचे सांगीतले.पथकाने घटना ठिकाणाहुन 5,30,000/- रू किंमतीचे 25 गोवंशीय लहान मोठी गायी, गोऱ्हे व कालवडी अशी जनावरे ताब्यात घेतली.

पथकाने वर नमूद आरोपीविरूध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1014/2026 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5(अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. 

 

वरील कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.