रात्री 10 नंतर वाद्य, डीजे वाजवले तर गुन्हा दाखल; राहुरी पोलिसांचा इशारा*
अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार राहुरीत नवीन सूचना जारी झाल्या आहेत.
*रात्री 10 नंतर वाद्य, डीजे वाजवले तर गुन्हा दाखल; राहुरी पोलिसांचा इशारा*
*राहुरी, दि. 11 मे 2026*: अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार रात्री 10 नंतर वाद्य, डीजे, साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज 11 मे रोजी राहुरी तालुक्यातील साऊंड सिस्टीम चालक आणि मंगल कार्यालय मालकांची बैठक घेतली. बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी किंवा वाद्य वाजवले तर साऊंड सिस्टीम चालक, मंगल कार्यालय मालक आणि कार्यक्रम आयोजकांवर आवाज प्रदूषण कायदा 2002 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल.
लग्न, साखरपुडा आणि इतर कार्यक्रमांमुळे रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी वाढल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींनुसार पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.








