श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील खोकरसह, अशोकनगर ,बेलापूर टाकळीभान अशी अनेक गावे श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी बंद....

प्रशांत राजे शिंदे

!!

श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरला आले पाहिजे या मागणीसाठी श्रीरामपूर बंदला वरील अनेक गावांनी पाठिंबा दिला आहे श्रीरामपूर तालुक्यातून बेलापूर गाव टाकळीभान ,अशोकनगर ,हरेगाव, खोकर ,भोकर आदी सह काही गावांमध्ये दैनंदिन व्यवहार व दुकाने बंद ठेवून श्रीरामपूर बंदला पाठिंबा देण्यात आला तसेच अशोकनगर या गावा मधील देखील व्यापारी यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवुन आपला निषेध नोंदविला त्याच प्रमाणे खोकर गावातील तसेच अशोकनगर मधील देखील संपूर्ण बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली होती सर्व राजकीय पक्ष तसेच व्यापारी संघटनांनी श्रीरामपूर बंदला  पाठिंबा दिला खोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर चे संचालक राजेंद्र काशिनाथ चक्रनारायण यांच्या नेतृत्वाखाली खोकर बंद चे आव्हान करण्यात आले होते या अहवानास प्रतिसाद देत खोकर गावातील सर्व व्यापारी तसेच राजकीय पदाधिकारी, छोटे व्यावसायिक यांनी स्वयम् स्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी आणावे म्हणून 100% बंद यशस्वी केला या बंद करिता खोकर  ग्रामपंचायतचे सरपंच रावसाहेब चक्रनारायण ,उपसरपंच दीपक काळे, ससाने गटाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र सलालकर छावा संघटनेचे पदाधिकारी दत्तू भाऊ कसबे ,छावा संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब अभंग, तालुका उपाध्यक्ष सलालकर, खोकर सोसायटीचे संचालक कादरभाई सय्यद, व्यावसायिक मुन्नाभाई सय्यद, रवींद्र सिन्नरकर, नाभिक संघटनेचे संजय जगताप, दिनकर सलालकर, राजूभाऊ सय्यद ,संदीप पवार ,दत्तू मामा चव्हाण, तसेच खोकर गावातील डॉक्टर अनिकेत चव्हाण यांनी स्वयं स्फूर्तीने श्रीरामपूर  जिल्हा व्हावा या मागणी करिता आपला दवाखाना पूर्णपणे बंद ठेवला होता हा बंद यशस्वी करण्याकरिता सर्वांनी अथक परिश्रम घेतले,