शिवांकुर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा .व्यायाम, प्राणायाम व सूर्यनमस्काराने मनुष्याचे शरीर निरोगी व बुद्धी शांत राहते-योगशिक्षिका शिवानी येरकल .
*शिवांकुर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा…*
शिवांकुर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्काराने मनुष्याचे शरीर निरोगी व बुद्धी शांत राहते असे प्रतिपादन योगशिक्षिका शिवानी येरकल यांनी केले.
विद्यालयात जागतिक योगा दिनानिमित्त योगशिक्षिका शिवानी येरकल यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगा, सूर्यनमस्कार, व्यायाम याचे महत्त्व सांगितले व योगाचे अनेक प्रकार व त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी देखील प्राणायाम, विविध आसने, सूर्यनमस्कार याचे प्रात्यक्षिक केले. संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार यांनी विद्यार्थ्यांना योगा आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.
योग दिन साजरा करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, युवराज पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जाधव व आभार सुजाता तारडे यांनी केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव , पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, दुर्गा वाघचौरे, साक्षी शिंदे, अंजली धोंडे व लिपिक महेश अभंग, शिपाई शारदा तमनर, स,आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते...