राहुरी शहरात बाजारपेठेतील 4 दुकाने फोडून घरफोडी करणारा सराईत आरोपी 4 दिवसात राहुरी पोलिसांनी केला जेरबंद .
राहुरी शहरात बाजार पेठीतील 4 दुकाने फोडुन घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी 4 दिवसांत अटक .
राहुरी शहरातील बाजारपेठेमध्ये एका रात्रीत अज्ञात चोरट्याने चार दुकाने फोडून जणूकाही राहुरी पोलिसांना आव्हानच दिले होते परंतु चोराने दिलेलं आव्हान पोलिसांनी चारच दिवसात मोडीत काढून आरोपीस ताब्यात घेत जेलची हवा खाण्यास भाग पाडले आहे .सदर घटनेची हकीकत अशी की दि. 19/02/2024 रोजी रात्री 20.00 ते दि.20/02/2024 रोजी सकाळी 08.00 वा. दरम्यान राहुरी शहरातील विविधी दुकाने फोडुन एकुण 46000 /- रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केलेली होती. त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 181/2024 भा.दं.वि.कलम 457,380 प्रमाणे तसेच गु.र .न. 189/2024 ,190/2024,191/2024 भा.दं.वि.कलम 457,380 प्रमाणे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदर गुन्हयामध्ये आरोपी बाबत काहीएक माहिती नसतांना गुन्हयाचा तांत्रीक पुराव्याच्या आधारे व राहुरी शहरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज वरुन केलेल्या तपासामध्ये एक संशयीत आरोपीची माहिती उपलब्ध झाली. सदरची माहिती सोशल मिडीयाच्या आधारे प्रसार केल्याने आरोपी दगडुबा मुकुंदा बोर्डे रा.पेरजापुर ता.भोकरदन जिल्हा जालना हा इगतपुरी पोलीस स्टेशन जि.नाशिक येथे मिळुन आला. आरोपीस ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे आणुन आरोपीस नमुद गुन्हयामध्ये अटक करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपीस मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. कोर्ट राहुरी यांच्या समक्ष हजर करण्यात आले असुन आरोपीची दि.29/02/2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे.पकडण्यात आलेल्या आरोपीवर अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून राहुरी शहरात बाजारपेठेतील दुकाने फोडण्याच्या गुन्हयाचा अधिक तपास पो.हे.कॉ. बाबासाहेब शेळके नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन हे करत आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र नाशिक यांनी एक सी.सी.टी.व्ही. कॅमेरा दुकानासाठी व एक सी.सी.टी.व्ही.कॅमेरा शहरासाठी अशी संकल्पना राबविलेले आहे. या संकल्पना आधारेच सी.सी.टी.व्ही. कॅमेराच्या आधारे आरोपीचा शोध होवुन गुन्हा उघडकीस आलेला आहे. तरी राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येते की, राहुरी तालुक्यातील सर्व नागरीक, व्यापारी , दुकानदार यांनीही विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेस प्रतिसाद देवुन सी.सी.टी.व्ही.कॅमेरा बसवावेत.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पोहेकॉ. विकास वैराळ, पोहेकॉ बाबासाहेब शेळके, पो.हे.कॉ.विकास साळवे, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पोकॉ अमोल गायकवाड, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर व पो.ना.सचिन धनद, पो.ना.संतोष दरेकर, पो.ना.रामेश्वर वेताळ नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि.अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेलाआहे.