दिव्यांग व्यक्ती करिता विशेष घरकुल योजना राबवावी - संजय साळवे
श्रीरामपूर : दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ देत असताना स्वतःची जागा नसल्याकारणाने दिव्यांग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहत आहेत.दिव्यांग व्यक्तींना स्वतःची जागा नाही.रोजगार उपलब्ध नाही,आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याकारणाने दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्वतःची जागा विकत घेणे शक्य नाही.
त्यामुळे शासनाने सदरची अट रद्द करावी अथवा दिव्यांग व्यक्तींना शेती महामंडळ, गावठाण किंवा गायरान जमिनी या ठिकाणी शासनाने त्यावर दिव्यांग व्यक्ती करिता आरक्षण टाकून त्या दिव्यांग व्यक्तींच्या नांवावर विनाअट करावीत किंवा ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींच्या एकुण संख्येनुसार जागा अधिग्रहित करून दिव्यांग व्यक्ती करिता विशेष घरकुल योजना राबविण्यात अशी मागणी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे आणि सचिव वर्षा गायकवाड यांनी निवेदनाद्वारे राज्याचे महसूलमंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे केली आहे.
श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदानावर आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमात अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने दिव्यागांच्या विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आसान दिव्यांग संघटना प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी,महिला प्रदेशाध्यक्ष सौ. स्नेहा कुलकर्णी,दत्तनगर शाखाध्यक्ष सौ.विमल जाधव,खोकर शाखाध्यक्ष विकास साळवे,दादाराम जाधव,गणेश बनसोडे,जीवन पवार,संदिप भोंगळ,आदम शेख,किसन साळवे,योगेश काळे, पप्पु आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.