पंतप्रधान साहेब या देशात चाललय काय , आदराने बोला अन्यथा किंमत मोजावी लागेल हे फक्त बोलण्यापुरतेच का, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकाराला दिलेल्या धमकीवर कारवाई करणार का ?

पंतप्रधान साहेब या देशात चाललय काय , आदराने बोला अन्यथा किंमत मोजावी लागेल हे फक्त बोलण्यापुरतेच का, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकाराला दिलेल्या धमकीवर कारवाई करणार का ?

           हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी ही जाहीर केले आहे की,पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्यास तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो .पत्रकारांना धमकी देणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल,पत्रकारांना धमकवले प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही .पत्रकार हा जमावाचा भाग नाही ही बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राज्य सरकारला ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत .परंतु या सूचना हवेतच विरल्याचे दिसून येत आहे .अनेक वेळा सरकारी कर्मचारी पत्रकारांशी असभ्यवर्तन करताना दिसत आहे .अशीच एक घटना राहुरी तालुक्यात दिनांक 26 जून 2024 रोजी घडली आहे .

 

           राहुरी तहसील येथे शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडत असताना राहुरी तालुक्यातील प्रतिनिधी श्री . मनोज साळवे हे या निवडणुकीचे छायाचित्रण करत असताना मतदान कक्षातील छायाचित्रणाची वरिष्ठांकडून परवानगी घेऊन छायाचित्रण करावे यासाठी परवानगी घेण्यासाठी गेले असता तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकार मनोज साळवे यांना मतदानासाठी आलेल्या असंख्य शिक्षकांसमोर अपमानित करून अतिशय रागाने कक्षाच्या बाहेर व्हा नाहीतर गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली .

 

             मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून एका पत्रकाराला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांनी व्यक्त केले. राहुरी तालूक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आले. या प्रसंगी निसारभाई सय्यद बोलत होते. 

        

        अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होते. या घटनेचा आम्ही राहुरी तालूक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी व प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहिर निषेध करतो. असे तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पत्रकारांच्या वतीने संबंधित अधिकारी व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. 

       

 

            या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, आर आर जाधव, राजेंद्र उंडे, भारतीय पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख कृष्णा गायकवाड,कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनीत धसाळ, रमेश खेमनर, बंडू म्हसे, सचिन पवार, नानासाहेब जोशी, आप्पासाहेब मकासरे, अशोक मंडलिक, मनोज साळवे, राजेंद्र पवार, राजेंद्र म्हसे, सतीष फुलसौंदर, मीनाश पटेकर, शरद पाचारणे,श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आकाश येवले, देवराज मंन्तोडे आदिसह अनेक पत्रकार उपस्थित होते.