अहिल्यानगरचे पो.अधिक्षक राकेश ओला यांचेवर कार्यवाही करून हाकालपट्टी न झाल्यास दि.२६ जानेवारी रोजी पासून करणार आमरण उपोषण.
अहिल्यानगरचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून त्यांच्या विरोधात अहिल्यानगर मध्ये राजकिय - सामाजीक संघटनेने ऐतिहासिक उपोषणे आंदोलने झाली आहेत.. अवैध व्यवसायांना पाठबळ देणे व्यापाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून त्यांचेकडून आर्थिक माया गोळा करणे असे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात आजही दारू, मटका,जुगार,गांजा,अवैध वेश्या व्यवसाय,पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांकडून आर्थिक तडजोड करून त्यांचेवर कार्यवाही न करणे
ओला यांचेवर पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची चौकशी करण्याचे आदेश
मा.जिल्हा सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी दिले आहेत,
क्रिमिनल अर्ज 55/2024 प्रमाणे ते दाखल आहेत
राकेश ओला यांचे विरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत ही मा.जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार अर्ज 257/2024
प्रमाणे दाखल असून तो न्यायप्रविष्ट आहे.
अशा वादग्रस्त असणाऱ्या राकेश ओला यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करून अहिल्यानगर येथून हकालपट्टी करावी
अन्यथा येत्या दि.26 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषण करण्यात येईल
अशी मागणी श्री.विजय अण्णासाहेब मकासरे यांनी पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे प्रत्यक्ष दिली.