राहुरी बुद्रुक येथील काळे आखाडा येथे कृषी विभागामार्फत शेतीशाळा संपन्न .

राहुरी बुद्रुक येथील काळे आखाडा येथे कृषी विभागामार्फत शेतीशाळा संपन्न .

*राहुरी बुद्रुक येथील काळे आखाडा येथे कृषी विभागामार्फत शेतीशाळा संपन्न* 

          राहुरी बुद्रुक येथील काळे आखाडा येथे कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा कार्यक्रमांतर्गत चालू खरीप हंगामामध्ये कापूस पिकाचे लागवडीचे अंतर, वाणाची निवड, सापळा पिके ,तसेच लागवड करण्यापूर्वी बियाणे बीजप्रक्रिया, माती परीक्षणानुसार खतांचा वापर याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी श्री शरद लांबे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन पिकाची पेरणी करताना 75 मिमी पाऊस झाल्यानंतरच तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत बीबीएफ या पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी करावी त्याचबरोबर सोयाबीन बियाणे ची उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी असल्यास अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे .पेरणीपूर्वी बियाण्यास कारबॉक्सिन + थायरम या बुरशीनाशकाची 3ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया करावी .तसेच खोड माशीच्या नियंत्रणासाठी थायमेथॉक्झाम या कीटकनाशकाची 10मिली प्रती किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी .व नंतर रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धनाची अडीशे ग्रॅम प्रति 10 किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .

           काळे आखाडा येथील प्रगतशील शेतकरी श्री राजू अण्णा काळे यांनी मागील वर्षी सोयाबीन पिकाची टोकण पद्धतीने लागवड करून एकरी 16 क्विंटल उत्पादन कसे घेतले याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमास श्री गोरक्षनाथ काळे, लक्ष्मण तनपुरे, लक्ष्मण सांगळे, कारभारी काळे, सुखदेव काळे, अंबादास काळे ,नानासाहेब सांगळे, परसराम काळे, भागवत गुंजाळ, वसंत गुंजाळ ,आप्पासाहेब काळे, गोपी सांगळे, दिपक म्हसे, राहुल डवले व परिसरातील शेतकरी उपस्थित होते सहाय्यक कृषी अधिकारी श्री चंद्रकांत म्हसे यांनी आभार मानले.