लोखंडी तलवार व लोखंडी कोयता बाळगणाऱ्या विरुद्ध राहुरी पोलीसांची कारवाई
लोखंडी तलवार व लोखंडी कोयता बाळगणा-या विरुध्द राहुरी पोलीसांची कारवाई .
प्रस्तुत घटनेची हकिकत अशी की, दि.05/04/2024 रोजी माननीय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनिय माहीती मिळाली की, ज्ञानेश्वर उद्यान जवळ राहुरी खुर्द राहुरी ते नगर जाणारे रोडवर तालुका राहुरी परिसरात एक इसम गोणी मध्ये लोखंडी तलवार व लोखंडी कोयता घेऊन जात आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावून सदर इसमास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या, हातातील गोणी मध्ये असलेली लोखंडी तलवार व लोखंडी कोयता ताब्यात घेऊन सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय गणेश दाभाडे (वय -20 वर्ष ) राहणार गोटूंबे आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगीतल्याने सदर इसमाविरुध्द राहुरी पोस्टे गुरंन 398/2024 शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास वैराळ, नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सतीश कुराडे, सचिन ताजने, अंकुश भोसले नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे .