ऊसतोड कामगाराचा मोबाईल व पैसे हरवलेले परत मागे देणारा म. हिवरा येथिल अशोक निर्मळ यांच्या इमानदारीचे कौतुक
शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे एका ऊसतोड कामगाराचा मोबाईल व तीन हजार रुपये(३०००) हरवले होते. ते योगायोगाने नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथील प्रगतशील बागातदार शेतकरी इमानदार व्यक्ती अशोक निर्मळ यांना सापडले. व त्यांनी इकडे तिकडे चौकशी करून मोबाईल मधील नंबर ची खात्री करून त्या गरीब ऊसतोड कामगाराला शोधून त्या माणसाची अमानत परत त्या माणसाला दिली. त्याबद्दल महालक्ष्मी हिवरा येथील अशोक निर्मळ याचे परिसरातून व नेवासा तालुक्यातून कौतुक होत आहे. या स्तुत्य कामांमध्ये नामदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक सलीमराजे शेख यांनी या कामात मोठी मदत केली.
यावेळी सलीम राजे म्हणाले की हा नेवासा तालुका संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे .ही भूमी संताची आहे. म्हणुन या भूमीत इमानदारी आजुन शिल्लक आहे. म्हणुन या भूमीतील अशोकराव निर्मळ धार्मिक कुटुंबातील असल्याने त्यांनी जराही विचार न करता पैसै व मोबाईल दिला त्याबद्दल नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळ च्या वतीने अभिनंदन केले आहे.
त्या ऊसतोड मजुरांचे पैसे व मोबाईल परत देताना गोरख राव गायके, दुरण गायके,माणिक शेठ ,महादेव सानप, अब्बास शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
बी पी एस न्यूज चॅनल प्रतिनिधी युनुस पठाण बालाजी देडगाव नेवासा