राहुरी पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आलेल्या अमली पदार्थ विरोधी अभियानाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 1200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व रॅलीने झाली सांगता .

राहुरी पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आलेल्या अमली पदार्थ विरोधी अभियानाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 1200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व रॅलीने झाली सांगता .

राहुरी पोलीस स्टेशन तर्फे राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियानाची आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 1200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व रॅलीने झाली सांगता .

 

          राहुरी पोलीस स्टेशन तर्फे दिनांक *13/8/2025 ते 17/82025 असे चार दिवस राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान* राबविण्यात आले सदर अभियानामध्ये राहुरी शहर व तालुक्यातील शाळा व विद्यालयातील *सुमारे 9000 विद्यार्थ्यांना राहुरी पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ विरोधी अभियाना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.* तसेच अभियानाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आंतर शालेय विविध स्पर्धा घेऊन, 15 ऑगस्ट 2025 रोजी पारितोषिक देण्यात आले.

         अभियानाच्या शेवटच्या दिवशी आज दिनांक 17/8/2025 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डॉ.सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा व कार्यशाळा या कार्यक्रमासाठी राज्यातून आलेले सुमारे 1200 विद्यार्थी व त्यांचे सुमारे 2400 पालकांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियाना अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मार्गदर्शन केले* व त्यानंतर सदर अभीयाना अंतर्गत रॅली काढूनजनजागृती केली. सदर रॅलीमध्ये विद्यार्थी व पालकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

           सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर फाकटकर , तंत्रज्ञ GMRT, खोडद पुणे व अंकिता नगरकर, पुणे तसेच अध्यक्ष म्हणून क्षीरसागर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे लाभले .अमली पदार्थ विरुद्ध जनजागृती बरोबरच राज्यभरातील सी व्ही रामनवैज्ञानिक परीक्षेतील तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षिस पात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले .

         सदर अमली पदार्थ विरोधी जनजागृतीची मोहीम ही पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली .