शिवजयंती च्या निमित्ताने केले रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी दि २१ - अनेक वर्षे पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र येलवाडी गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते.परंतु या वर्षी सामाजिक उपक्रम राबवत शिवजयंती साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे या वर्षी ची शिवजयंती ही पूर्ण पणे पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली यात प्रामुख्याने मल्ल खांब,दांड पट्टा, भजन,ठोल ताशा,,रस्सी खेळ यांचा समावेश केला होता त्याच बरोबर एक समाजसेवेच्या भावनेतून तिसऱ्या दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये गावातील तरुण वर्ग व महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता.