डी पॉल पब्लिक स्कूल (सीबीएसई) येथे संत थॉमस दिन साजरा. .. !!!

डी पॉल पब्लिक स्कूल (सीबीएसई) येथे संत थॉमस दिन  साजरा. .. !!!

श्रीरामपूर -

श्रीरामपूर शहरा लगत असणाऱ्या डि पॉल पब्लिक स्कूल (सीबीएसई) येथे संत थॉमस दिनानिमित्त संत थॉमस सण साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सणाच्या निमित्ताने स्कूल इंविस्टचर सरेमनी चे आयोजन करण्यात आले.या मध्ये स्कूल हेड बॉय आणि हेड गर्ल ची निवड करण्यात आली.तसेच रेड हाउस,  ग्रीन हाऊस ,येल्लो हाऊस, ब्लु हाउस यांचे लीडर नेमण्यात आले.निवडलेल्या सर्व लीडर्स ना बॅचेस व हाऊस फ्लॅग देण्यात आला.हेड बॉय व हेड गर्ल याना त्याच्या पदाची शपथ स्कूल चे प्रिंसिपल रेव्ह फा.शिजो व मॅनेजर रेव्ह फा.थॉमस यांनी दिली.त्या नंतर विद्यार्थ्यांनी संचलन केले.
   शाळेचे पी.आर.ओ. अशोक पवार सर  यांनी आपल्या भाषणात संत थॉमस यांच्या बद्दल माहिती दिली. तसेच  विद्यालयाचे मॅनेजर रेव्ह. फादर थॉमस यांनी  सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
 यानंतर संत थॉमस यांचा सण साजरा करण्यात आला. सर
   विद्यालयाचे  प्रिन्सिपल रेव्ह.  फा. शिजो यांनी विद्यालयाचे मॅनेजर नवीन फादर थॉमस यांचा पुष्पगुच्छ  देऊन सत्कार केला.  तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने फादर यांना भेटवस्तू देण्यात आल्या. फादरानी केक कापून सण साजरा केला.या ठिकाणी फादर थॉमस यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कोणकोणत्या अडचणी येतात व त्यावर कशी मात करावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच पुस्तकांचे आपल्या जीवनातील महत्त्व प्रकट केले. या ठिकाणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इयत्ता पाचवी मुलींनी प्रेयर डान्स तसेच ग्रुप डान्स सादर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी विनोदी नाटक सादर केले. तसेच चौथी च्या विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स सादर केला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना केकचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मॅनेजर रेव्ह फा. थॉमस,  तसेच मुख्याध्यापक रेव्ह. फा.शिजो उपमुख्यद्यापिका सिस्टर दीप्ती,सिस्टर रिटा  सेक्रेटरी सोनम वादवा,आशिष सर, स्मिता मॅडम ,भाग्यश्री मॅडम   या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धांत लहरे व काव्य महाजन या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या केले. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,तसेच दीपक कदम यांचे  सहकार्य लाभले,

( प्रतिनिधी -- दिपक कदम.बी.पी.एस.लाईव्ह न्यूज श्रीरामपूर )