माननीय. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे . ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांना ग्राम रोजगार सेवक व कर्मचारी संघटना यांचे निवेदन
महाराष्ट्राचे माननिय. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे , व श्री श्रीकांत शिंदे खासदार ठाणे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तातडीने निवेदनावर कार्यवाही करुन प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत.प्रतिमाह फिक्स मानधन आणि सेवेत सामावून घेण्यासाठी शब्द दिला आहे,तसे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत याप्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री लांडगे साहेब,कल्यान चे नगरसेवक श्री नविन गवळी साहेब आणि श्री संदिप माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.आज महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना एन जी पी ५१०२ चे संस्थापक उपाध्यक्ष श्री सोन्याबापू शेवकर साहेब, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री दत्तात्रेय सुतार साहेब आणि मी राज्य प्रसिध्दी प्रमुख सोनी शर्मा उपस्थित होते.