मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने हिंदवी स्वराज्याचे तोरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणागडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.
प्रतिनिधी -दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही शिव राज्यभिषेक सोहळ्या निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण ,गड संवर्धन मोहिमा राबविण्यात आल्या त्यातीलच एक मोहीम मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान मार्फत किल्ले तोरणा येथे राबविण्यात आली.शिवराज्याभिषेक निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर स्वच्छता करण्याच्या उद्धेशाने ही मोहिम घेण्यात आली होती.यामध्ये प्रथम गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .त्यानंतर गडावरील देवीच्या मंदिराजवळ साफ़ सफाई करण्यात आली.व नंतर गडावरील बुरुज पूर्ण पणे स्वच्छ करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला तोरणा गड जिकुंन तो स्वराज्यात दाखल केला म्हणून तोरणा गडावर ही मोहीम शिवमुद्रा प्रतिष्ठान द्वारे संपन्न करण्यात आली.या मोहिमेत मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी व महिला रणरागिणी उपस्थित होते.