मा. चंद्रशेखर घुले पाटील.मा.क्षितिज भैया घुले पा.मा. नरेंद्र घुले पा.यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन.
मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील आणि सभापती डॉ क्षितिजभैय्या नरेंद्रजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा धरणातुन शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन.
चालू वर्षी शेवगाव पाथर्डी तालुक्यात पाऊसान ओढ दिल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्या अभावी सुकून करपु लागले आहेत त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे सध्या मुळा धरणामध्ये पाणीसाठा मुबलक असून त्यातून लवकरात लवकर पिकांसाठी आवर्तन सोडवावे जेणेकरून लाभ क्षेत्रातील पिकांना व त्याच बरोबर शेतकऱ्याला जीवनदान मिळेल या आशयाचे पत्र कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना देण्यात आले आणि या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आजच्या इशारा देण्यात आला.
यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी लवकरात लवकर आर्वतन सोडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय कोळगे राजेंद्रजी देशमुख ,रघुनाथ उगले,दिलीपजी आव्हाड ,दीपकजी न्ननवरे, यशवंतजी पाटेकर, पांडुरंग दातीर, विष्णु मुटकुळे, महादेव आव्हाड,रोहन साबळे ,संकेत वांढेकर आदी उपस्थित होते.