*पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने श्री क्षेत्र सोनारी येथील शेकडो माकडांसाठी खाद्य देऊन जपली सामाजिक बांधिलकी.*

*पोलीस  जाणीव  सेवा  संघ  बार्शीच्या  वतीने  श्री क्षेत्र  सोनारी  येथील शेकडो माकडांसाठी  खाद्य  देऊन  जपली  सामाजिक  बांधिलकी.*

बी पी एस राष्ट्रीय न्यूज उस्मानाबाद

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

सोनारी.(ता.परंडा)      दि.16-04-2022 रोजी सोनारी येथे श्री हनुमान जयंती जन्मोत्सव निमित्त पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शीच्या वतीने श्री काळभैरवनाथ क्षेत्र सोनारी याठिकाणी जवळजवळ 500 माकडांसाठी बेस्टपाव, बुंदीचे लाडू व इतर खाद्य देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. या ठिकाणी हजारो माकडांचे वास्तव्य आहे, श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून हा खाद्य वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. आपण गरजू व्यक्तींना अन्नदान करतो पण मुक्या प्राण्यांना बोलता येत नसल्यामुळे त्यांची व्यथा समजून घेणे खूप कठीण आहे, जीवदया दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. असे वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने कार्यक्रम घेण्यात येतात. हा कार्यक्रम बार्शीतील पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी उपस्थित- पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभागप्रमुख- श्री उमेश आनेराव, उपविभागप्रमुख- श्री समाधान विधाते, तालुका संपर्कप्रमुख- श्री सम्मेद तरटे, बार्शी कार्याध्यक्ष- श्री रमेश डोंगरे, संघाचे मार्गदर्शक- श्री भगवान लोकरे सर- सदस्य अभिजीत लाला.

तसेच पोलीस जाणीव सेवा संघाची महिला टीम- बार्शी तालुका संपर्कप्रमुख- सौ.रूपालीताई विधाते तालुका उपसंपर्कप्रमुख- सौ. अमृताताई आनेराव, बार्शी शहर संपर्क प्रमुख-सौ.मनिषाताई लोकरे, बळेवाडी अध्यक्षा- सौ.

वर्षाताई तरटे, बार्शी कार्याध्यक्ष- सौ.राधाताई घोंगाने, सचिव- सौ.अंजना शिंदे आदींनी या मुक्या प्राण्यांना खाद्य खाऊ घालून मोलाचा वाटा उचलला.