कोणतेही मतभेद न ठेवता राहुरी तालुक्यातील टाकळीमीया गावात शिवस्मारक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारणार- बाळासाहेब जाधव

कोणतेही मतभेद न ठेवता राहुरी तालुक्यातील टाकळीमीया गावात शिवस्मारक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारणार- बाळासाहेब जाधव

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गाव येथे दि.२.३.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक उभारणीसाठी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथालय उभारणी करीता ग्रामस्थांची विषेश ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व शिवस्मारक उभारण्यात येण्याबाबत चर्चा करण्यात आली व ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला दरम्यान काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी सदर चर्चेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला.

या चर्चेतून कलह निर्मान झाले यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे परंतू त्याला एक ठराविक पद्धत आहे एकमेकांची मत जाणून घेणे गरजेचे असता तसे न होता एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम याठीकानि झाले आहे इतर महा पुरुषांचे स्मारके ही गावात होणे गरजेचे आहे व त्याची मागणी करणे रास्त असले तरी ती मागणी करणेची किंवा म्हणने मांडणेची एक पद्धत असते ती पद्धत या ठीकानि वापरली गेली नाही व सदर ग्रामसभेला वेगळे वळण लागले गालबोट लागले.

हि बाब खेदाची आहे सदरचा झालेला वाद गाव पातळीवरही मिटवता आला असता व सदरवाद गावपातळीवर मिटवण्याचा माझा प्रयत्न असफल झाला.

व परस्पर एकमेकांवर गुन्हे दाखल होण्याचे काम येथे झाले आहे वास्तविक पहाता मी एका चांगल्या राजकिय पक्षाचा पदाधीकारी म्हणून सदर घटणेची माझ्याकडे चौकशी होणे गरजेचे होते तसे याठीकाणी झाले नाही याउलट मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षाच्या वरीष्ठ पदाधीकाऱ्यांनी माझ्यावरच आरोप करून मी प्रामाणेकपणे पक्षाचे काम करत असताना देखील मलाच गद्धारांच्या यादीत बसवण्याचा प्रयत्न झालेला आहे.

आणी म्हणून मी सदर पक्षाच्या पदाचा राजीनामा देवून अलिप्त झालो आहे असे श्री बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परीषदेत सांगितले पत्रकारांना सामोरे जातांना बाळासाहेब जाधव म्हणाले कि माझ्या गावाने यापूर्वि कधीही जातिभेद केला नाही पुढेही भविष्यात करणार नाही याची मी ग्वाही देतो.

गावात सर्व समाजाच्या व्यक्तींनी मिळून मिसळून एकमेकांच्या विचारांत राहुन काम केलेले आहेत व करत आहेत.

सर्व ग्रामस्थांच्या सलोख्याने गावात शिवस्मारक व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे काम पूर्ण केल्या शिवाय मी स्वस्थ बसनार नाही असे आव्वाहन श्री जाधव यांनी केले.सदरची पत्रकार परीषद ही मियासाहेब बाबा दर्गा येथे घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेला प्रचंड गर्दी झाल्याने सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

या पत्रकार परीषदेवेळी सुरेश आप्पा निमसे.श्याम काका निमसे.सुनिल शिन्दे. सुभाष करपे.अन्ना सगळगिळे.ग्रा.प. सदस्य सुरेश करपे.गुलाबराव निमसे. ज्ञानदेव निमसे.सुभाष जगधने.गिरीष निमसे. लक्ष्मण सगळगिळे.शफीक शेख. प्रताप जाधव. अकबर सय्यद.भाऊसाहेब सगळगिळे.अरुण शिन्दे.अजिंक्य निमसे. कमालभाई शेख. सुरेश तोडमल.राजु सगळगिळे.भागवत नवाळे.चंद्रकांत सगळगिळे. राहुल चोथे. प्रताप निमसे. संदीप विधाटे.राजेंद्र निमसे.संतोष चोथे. आशोक करपे.रोहन भुजाडी.बन्टी गोसावी. जिजाभाऊ चिंधे आदींसह माठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थीत होते.