नवसाला पावणारी रेणुका माता देवीवस्ती देडगाव येथे नवरात्र निमीत्ताने देवी कथा व विविध कार्यक्रमांचे आयोजन.
अहमदनगर जिल्ह्यातील पवित्र नेवासा तालुक्यातील भगवंत बालाजीच्या पुण्य पावन भूमी
मध्ये नवरात्र निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व देवी पुजारी श्री जगन्नाथ शेटे यांच्या अधिपत्याखाली देवी वस्ती या ठिकाणी असलेले रेणुका माता मंदिर हे जागृत देवस्थान असुन येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
ही रेणुका माता नवसाला पावणारी जागृत देवी असुन ही भक्ताचा उद्धार करणारी माता आहे. दोन वर्ष कोरोणा संकट असल्याने महाराष्ट्रातील मंदीर बंद असल्याने उत्साह होऊ शकले नाही .म्हणून या वर्षी मोठ्या आनंदात हा नवरात्र उत्साह साजरा करण्यात येत आहे . म्हणुन या ठिकाणी जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात .ना जात भेद सर्वांची असणारी नवसाला पावणारी रेणुका मायाळू माता या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येऊन हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.
यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प रामायणाचार्य पाटेकर महाराज गेवराई यांच्या मधुर वाणीतून देवी कथेचं आयोजन केले आहे. व या नवरात्राची सांगता ह भ प संगीता ताई गायकवाड ( माणिक दौंडी) यांच्या सुश्राव्य कीर्तनातून होणार आहे.
या ठिकाणी अन्नदात्यांनी दररोज फराळाचे नियोजन केले असून, भाविक आनंदाने प्रसाद घेत आहेत. व नवरात्र सांगता वेळेस महाप्रसादाचे नियोजन केले आहे. नवरात्राच्या कार्यक्रमासाठी जय भवानी युवा ग्रुप व देवी वस्ती परिसरातील लोक विशेष परिश्रम घेत आहेत.