विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आबासाहेबांचे महान कार्य :- प्राचार्य संपतराव दसपुते
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आबासाहेबाचे महान कार्य प्राचार्य संपतराव दसपुते
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एफ डी एल शिक्षण संस्था व आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाने जिल्ह्याला व राज्याला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अँड डॉ विद्याधरजी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केले असल्याचे प्रतिपादन आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांनी केले.ते आज कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती माह निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांच्या अध्यक्षतेखाली कर्मयोगी आबासाहेब काकडे बिजनेस इंडस्ट्री अँड कॉमर्स ॲकॅडमी चे प्रमाणपत्र वाटप आणि मार्गदर्शन सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे वित्त अधिकारी विपुलकुमार जोशी साहेब हे उपस्थित होते.ग्रामीण भागातील मुले अर्थसाक्षर व्हावीत या दूरदृष्टीने अँड डॉ विद्याधर काकडे साहेब व जि.प.सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यालयामध्ये कर्मयोगी आबासाहेब काकडे बिजनेस इंडस्ट्री अँड कॉमर्स अकॅडमी हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला होता.त्यामध्ये सहभागी असलेल्या इयत्ता सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे.बचतीची संकल्पना समजणे,वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती, विद्यार्थ्यांना कौशल्य पूर्ण शिक्षण देणे तसेच झालेल्या सर्व उपक्रम प्रात्यक्षिके व क्षेत्र भेटीची माहिती आणि वर्षभरात झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती चे विश्लेषण कॉमर्स अकॅडमी चे शिक्षक आनंद गायके यांनी केले,यानंतर विद्यार्थ्यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी कॉमर्स विषयी बेसिक संकल्पना समजावून घेऊन आणि त्याविषयीचे ज्ञान जाणून घेऊन आपल्यामध्ये बचतीच्या सवयी स्वीकारल्या पाहिजेत असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे विपुलकुमार जोशी साहेब यांनी केले.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी व्यवहारिक जीवन अर्थसाक्षर व भविष्यातील होणारे बदल याविषयी माहिती देत असताना गुंतवणूक,मार्केटिंग,फायनान्स या क्षेत्रांचा उल्लेख केला व त्याविषयी माहिती देऊन भविष्यातील करिअर विषयी संधी सांगितल्या,त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम शिला धिंदळे यांनी केले.प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीम पुष्पलता गरुड यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गरड यांनी मानले.यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते,पर्यवेक्षिका श्रीम पुष्पलता गरुड,ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब जाधव,किसनराव जाधव,बापूसाहेब डमरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य ला
भले.