चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूल सलबतपुरच्या ज्युनियर कॉलेज च्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूल सलबतपुरच्या ज्युनियर कॉलेज च्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

*चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेजच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*

              क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाने वाकडी ता.नेवासा येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत सलाबतपुर च्या चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेज च्या 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

          19 वर्ष वयोगटातील मुलींचा अंतिम सामना शनिश्र्वर ज्युनिअर कॉलेज सोनई विरुद्ध चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेज सलाबतपुर यांच्यात झाला. सदर सामन्यात चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेज च्या संघाने उत्तम खेळ करत शनिश्र्वर संघावर मात करून सामना एकहाती जिंकला.

             सदर संघात कु. वर्षा शिंदे,प्रांजली शिंदे, नेत्रा पाठक,गीता बोरुडे,रुपाली तांबे,रुपाली चावरे,अमृता नजन,सारिका कोहक,पायल कोहक,आक्सा कादरी, ऐश्वर्या गरड,कोमल दळवी, शितल तांबे,सानिया पठाण, संस्कृती करडक, या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सामना एकहाती जिंकून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

             सदर खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर,बबलू पठाण ,पंकज गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संघातील खेळाडू चे संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे,विश्वस्त अंबादास गोरे, डॉ.रवींद्र गोरे तसेच ग्रामस्थ,पालक,व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..