बारागाव नांदूर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.