मुंबईतील राज्यस्तरीय एरोमॉडेलिंग कॉम्पिटिशन IIT स्पर्धेत संस्कार जितेंद्र मेटकर च्या टिमने पटकावला तृतीय क्रमांक

अमेरिकेतील " बोईंग " या आंतरराष्ट्रीय एअरक्राफ्ट कंपनीचे विमान, मिसाईल, रॉकेट, उपग्रह अशी उत्पादने जगातील 150 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरली जात असून या क्षेत्रात ही जगातील सर्वोत्तम एयरक्राफ्ट कंपनी आहे .
याच नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात राज्यस्तरीय एरोमॉडेलिंग कॉम्पिटिशन IIT Bombay या ठिकाणी नुकतीच आयोजित केली होती. यात राज्यभरातील अनेक वेगवेगळ्या कॉलेजेसच्या 50 पेक्षा अधिक टीमने सहभाग घेतला होता. यात प्रत्येक टीमने बनविलेल्या विमानांच्या मॉडेलची अतिशय अवघड स्पर्धा होऊन त्याचे सर्व राऊंड अंतिमतः पूर्ण स्वरूपात पार पडलेत.आज त्याची अंतिम फेरी नुकतीच पार पडली असून त्याचा निकाल जाहीर झाला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक (55,000 ₹) Parul University (Fourth Year Students),द्वितीय क्रमांक (30,000 ₹) NMIMS Mumbai (Second Year Students)आणि तृतीय क्रमांक (20,000 ₹) प्रमाणे बक्षिस देण्यात आले आहे .
MIT ADT University, Pune (First Year Students).तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातच स्पर्धेचे अत्यंत अवघड निकष पार पाडून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.या टीम मध्ये 1) संस्कार जितेंद्र मेटकर ( टीम लीडर ) 2) ऋतुजा यादव 3) अर्श गावडे 4) सुप्रिया जोशी हे विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्व विजयी टीमची नॅशनल लेवल एरो-मॉडेलिंग कॉम्पिटिशनसाठी बेंगलोर या ठिकाणी निवड झाली असून राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धा देखील लवकरच पार पडणार आहेत.