कुशाबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण )नेवासा तालुक्यातील देडगाव येथील टकले वस्ती येथे कुशाबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन श्रीराम साधना आश्रम रामनगर चे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराजांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न.
या धार्मिक कार्यक्रमाचे दोन दिवसापासून आयोजन करण्यात आले होते . दिनांक 8 रोजी मूर्तीची गावभर फटाक्याच्या आतषबाजी मध्ये ,पारंपारिक नृत्य ,गज ढोल ,गज नृत्य व महिलांचे पारंपारिक भावगीते तसेच विविध कार्यक्रमाने सजवलेले रथामध्ये मुर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. या मिरवणुकीत महिलांच्या डोक्यावरील कलश परिसरात आकर्षण ठरले असून महिलांनी व पुरुषांनी फुगड्यांचा आनंद घेतला.
दिनांक 9 रोजी सकाळपासून होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक जोडप्यांनी सहभाग घेतला होता. नंतर महंत सुनीलगिरी महाराज ,ह भ प सुखदेव महाराज, पोपट देवा कोकरे व माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या शुभहस्ते कलश रोहन पूजा करत मूर्ती प्राणप्रतिष्ठेची पूजा करण्यात आली.
महंत सुनीलगिरी महाराजांनी या सोहळ्यानिमित्त प्रवचन रुपी सेवा दिली. तर ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व माजी सभापती सुनीताताई गडाख , खंडेश्वर कोकरे सर यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .
या सोहळ्यासाठी नेते निलेश कोकरे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, कुंडलिक दादा कदम,पैलवान रंगनाथ कोकरे, भारत कोकरे, सरगर देवा ,रामा देवा देवकाते ,विनायक घुगरे सर ,बारकू देवा धायगुडे ,सेल टॅक्स अधिकारी सोमा देवकाते ,तलाठी गोरख गोयकर मेजर कानिफनाथ गोफणे हे उपस्थित होते. तर पैलवान रामा टकले, काशिनाथ टकले, मसु टकले नामदेव टकले, विठ्ठल टकले,संपत टकले, भगवान टकले, संभाजी टकले, जी भाजी टकले बाळासाहेब टकले ,लहानू टकले ,किसन टकले यांनी परिश्रम घेत विशेष सहकार्य केले. जेऊर हैबती ,तेलकुडगाव, पाचुंदा ,माका आडगाव व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यानिमित्त उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.