श्रीराम मित्र मंडळाने गणेश जयंती निमित्त भंडाऱ्याचे आयोजन
गणेश जयंतीनिमित्त श्रीराम मित्र मंडळाच्यावतीने गणेश याग व भव्य भंडाऱ्याचे आयोजन.
राहुरी प्रतिनिधी- डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी शहरातील कासार गल्ली येथे काल दिनांक 22-1-2026 गणेश जयंतीनिमित्त गणेश याग व आज दिनांक 23-1_2026 रोजी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून
जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री अक्षय दाद कर्डीले राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक राजू भाऊ उंडे तसेच दादा पाटील सोनवणे , उमेश शेळके, रत्नाकर जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते गणपती बप्पाची आरती नैवद्य करण्यात आला. यावेळी कासार गल्ली येथे गणपती बप्पा मोरया या मंञ गोषाने दुमदुमली व यावेळी दादा पाटील सोनवणे

यांनी अक्षय दादा कर्डीले यांना श्रीराम गणेश मित्र मंडळ व शुक्लेश्वर मित्र मंडळ व कासार गल्लीच्यावतीने अक्षय दादा कर्डीले यांना विनंती केली आम्हाला येथे भव्य असे हेमाडपंती मंदिर व नवीन स्थापना करण्यासाठी विनंती केली. व अक्षय दादा कर्डीले यांनी मोठ्या मनाने कासार गल्ली व श्रीराम मित्र मंडळ यांना शब्द दिला की माझ्याकडून कोणती मदत जर लागली तर पुर्ण सहकार्य करेल. व नंतर सर्व भावीक भक्तांनी प्रसादाचा आनंद घेतला.








