शेल फोर्जिग प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

शेल फोर्जिग प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
शिर्डी_प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
शिर्डीच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वपूर्ण ठरला आहे. विखे पाटील यांनी शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दिलेल्या शब्दाची आश्वासनपूर्ती पूर्ण केली आहे.
निबे आॅर्डीनन्स ग्लोबल लिमिटेड अर्थातच शेल फोर्जिगचा प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ आज अहिल्यांनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
देशाच्या संरक्षण व्यवस्थेत आवश्यकता असलेला शेल फोर्जिग, शिर्डी मध्ये तयार करण्याचा सुरू होणारा प्रकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडीयाच्या संकल्पनेतील असून, आत्मनिर्भर भारताचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न होईल, तसेच शेल फोर्जिग प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विखे यांनी केले.
शेल फोर्जिंग प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळुन नवीन रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
शेल फोर्जींग प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी, अहिल्यांनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, डॉ. सुजय विखे तसेच प्रकल्पाचे चेअरमन गणेश निबे व औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश ठाकूर उपस्थित होते.