सोनई करजगाव व बा.नांदुर 14 गाव पाणी पुरवठा योजणा त्वरीत चालु करा अन्यथा मंत्र्याच्याच घरावर हंडा मोर्चा काढणार - सुरेशराव लांबे पाटील

सोनई करजगाव व बा.नांदुर 14 गाव पाणी पुरवठा योजणा त्वरीत चालु करा अन्यथा मंत्र्याच्याच घरावर हंडा मोर्चा काढणार - सुरेशराव लांबे पाटील

राहुरी : तालुक्यातील मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना धरण उशाला व कोरड घशाला अशी परिस्थिती तालुक्यातील व मुळा धरण कार्यक्षेत्रातील जनतेची व शेतकर्यांची झालेली आहे. या कार्यक्षेत्रात दोन आमदार मंत्री असून पाण्याचे कुठलेही नियोजन नाही. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सोनई- करजगाव व इतर 16 गावे पाणी योजना व बारागाव नांदूर 14 गाव पाणीपुरवठा योजना वीज बिलाच्या नावाखाली बंद करून ऐन उन्हाळ्यात पाणी बंद करून ह्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी त्यांच्याच मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. मुळा धरणातून असलेल्या सर्व पाणी योजना व मुळा ऊजवा कॅनालच्या सर्व पाटचा-या त्वरित चालू करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंत्र्याच्याच घरावर हंडा मोर्चा काढणाचा इशारा तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीत कोरोणाच्या नावाखाली शासन व प्रशासनाने कोट्यावधी रुपये जनतेच्या आरोग्यासाठी खर्च केले, आज कोरोना महामारीची तिव्रता कमी झाल्यानंतर तीव्र उन्हाळ्यात तालुक्यातील पाणी पुरवठा योजना बंद करून जनतेचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. या दोन्ही मंत्र्यानी बिजबील व पानी पट्टी च्या नावाखाली पिण्याच्या सर्व पाणी योजना व शेतीचे लिप्ट बंद करु नयेत व मागील वर्षी धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असताना फक्त नियोजनाचा अभावामुळे अनेकांना रब्बीतील पिक करता न आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले. आता अनेक शेतक-यांचे कांदा, गहु, ऊस व मुक्या जनावरांची चारा पिके पाट पुर्ण क्षमतेने चालु असतानाही जळुन चालली आहेत. तरी मुळा धरणापासुन सर्व पोटचा-यांना त्वरीत पाणी सोडावे व पुर्ण क्षमतेने शेतक-यांच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा व जलसंपदा विभागाने कॅनल वरील शेतक-यांचे खाजगी लिप्ट बंद करण्याचा जो आदेश काढला तो मागे घ्यावा अन्यथा राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य नागरीक व शेतक-यांना बरोबर घेऊन मंत्र्याच्या घरावर भव्य हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी दिला आहे.