अहिल्यानगरात अवैध चर्च कार्यक्रमप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
अहिल्यानगरात अवैध चर्च कार्यक्रमप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
अहिल्यानगर | 29 जुलै 2025
केडगाव, अमरधाम रोडवरील मोसंबी बागेजवळ विनापरवाना व जमावबंदी आदेश झुगारून आयोजित करण्यात आलेल्या अवैध धार्मिक कार्यक्रमप्रकरणी दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस शिपाई अनुप शेखर झाडबुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आशीष सत्राळकर व गणेश लाहवरे या दोघांनी 50-60 जणांच्या जमावासह परवानगीविना कार्यक्रम घेतल्याचे निष्पन्न झाले असून यासंदर्भात भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकाराला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असून, अशा प्रकारच्या अवैध धर्मप्रसार करणाऱ्या कार्यक्रमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही संघटनांनी हे प्रकार "धर्मांतराचा छुपा प्रयत्न" असल्याचा आरोप करत संबंधितांवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
स्थानिक पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सामाजिक शांतता भंग होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.









