बॅ.अ.र.अंतुले हे गोरगरिबांचे कैवारी व धडाडीचे कर्तबगार मुख्यमंत्री

बॅ.अ.र.अंतुले हे गोरगरिबांचे कैवारी व धडाडीचे कर्तबगार मुख्यमंत्री

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्यासारख्या धडाडीचा कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. त्यांनी आपल्या अठरा महिन्याच्या अल्पावधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये राज्यातील जनतेच्या हिताचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले.

गोरगरिबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जातात.शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी त्यांनी दिली.पोलिसांना फुल पॅंट दिली.समाजातील अनाथ आणि गरीब लोकांसाठी संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना चालू केली. लातूर,जालना,सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती केली. केंद्रीय मंत्री असताना पोलिओ डोस चा राष्ट्रीय कार्यक्रम लागू केला. एक हळव्या मनाचा, गोरगरिबांच्या प्रतिसानुभूती असलेला नेता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तयालचित्र सर्वप्रथम मंत्रालयात त्यांनी लावले तसेच कुलाबा जिल्ह्याला रायगड हे नाव दिले व भवानी तलवार आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांचे कार्य भावी पिढीसाठी निश्चितपणे दिशादर्शक आहे असे प्रतिपादन विविध मान्यवरांनी अब्दुल रहमान अंतुले यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

येथील मानवता संदेश फाउंडेशन व फातिमा वेल विशर ग्रुप तर्फे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप देवरे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय छल्लारे,अशोक मामा थोरे, श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये,राष्ट्रवादी मायनॉरिटी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा,भारत राष्ट्रसेवा समितीचे अध्यक्ष अशोक बागुल,मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम शेलार,काँग्रेस सेवा दलाचे सरवरअली सय्यद,विजय खाजेकर, नगरसेवक मुक्तार शाह, ताराचंद रणदिवे,लक्ष्मण कुमावत, ग्रंथपाल स्वाती पुरे आदींसह सर्व पक्षांचे नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मानवता संदेश फाउंडेशनचे समन्वयक सलीमखान पठाण यांनी अंतुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय छल्लारे यांनी अंतुले साहेबांसोबत दिल्लीत जेवण करण्याची संधी आम्हाला मिळाली.

बाळासाहेब ठाकरे यांचे ते मित्र होते. महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी त्यांनी कार्य केले असे सांगितले.

अशोक उपाध्ये यांनी सच्चा शिवभक्त म्हणून अंतुले यांचा उल्लेख केला.याप्रसंगी अशोक बागुल,खाजेकर,शेलार देवरे, सरवरअली मास्टर आदींनी देखील मनोगत व्यक्त केले.

नगरसेवक मुख्तार शहा यांनी आभार मानले.

कार्यक्रमास मुख्य आयोजक नजीरभाई शेख,अहमदभाई टेलर, याकुब शाह, सिद्धांत छल्लारे,आयाज तांबोळी, बुरहानभाई जमादार, सुधीर वायखिंडे, दत्तात्रय खरडे, तेजस बोरावके,  रोहित नाईक, भगवान उपाध्ये, उमेश छल्लारे, विकी गंगवाल,बापू बुधेकर,दिलीप मोरे, अनवर गनीभाई शेख, सय्यद जाकीर हुसेन, रियाज पठाण, रज्जाक पठाण, अब्दुल पठाण, जियान मुन्ना पठाण, सिकंदर खान, प्रकाश परदेशी, कलीम कुरेशी, गोपाल भोसले, रफिक शेख, समीर शेख, अजिज शेख,डॉक्टर सलीम शेख, इब्राहिम शेख मेजर, मुक्तार मणियार, अनिल इंगळे, खालीद मोमीन, तनवीर शेख, हसन पेंटर ,समीर शेख, मुस्ताक शेख, प्रकाश माने, दीपक कदम ,साजिद शेख, मोहम्मदअली हैदरभाई, सत्तार मंसूरी, रज्जाक शाह असलम बिनसाद, दीपक कदम, अन्वर भाई, विकी गंगवाल,  फिरोज शेख, फिरोज पठाण, समीर पठाण, असलम सय्यद, रज्जाक शाह,अक्रम शाह, रवि डुक्रे आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे व त्यांचे कार्यालयीन सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  - Reporter Delhi91 Bpslive News- Deepak Kadam, Shrirampur.