*पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीमचा तुळजापूर मध्ये कडेकोट बंदोबस्त.*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी,बळेवाडी )
बार्शी- पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष- रवी सर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तुळजापूर पोलीस निरीक्षक काशीद साहेब यांच्या निदर्शनाखाली,
कुर्डूवाडी- शेंद्री -खांडवी -बार्शी मार्ग पायी तुळजापूरला मोठ्या संख्येने जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेतेसाठी हा बंदोबस्त पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीम वतीने करण्यात आला. केवळ बार्शी तालुक्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश येथून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी यात्रिक मोठ्या संख्येने येत असतात.
तुळजापुर मध्ये पायी जाणाऱ्या भाविक -भक्तांच्या सुरक्षेतेसाठी तसेच तुळजापूर मध्ये तुळजाभवानी मंदिरात बंदोबस्तासाठी बार्शीतील पोलीस जाणीव सेवा संघाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला.
यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव, तालुका संपर्क प्रमुख- सम्मेद तरटे, कासारवाडी अध्यक्ष- निशिकांत सुतार, उपाध्यक्ष- अमोल चौधरी, सचिव- अक्षय शिंदे, सदस्य- अमोल चिंधे, हनुमंत निंबाळकर तसेच 19 जणांनी बंदोबस्त केला.