त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
*त्रिमुर्ती शैक्षणिक संकुल शेवगांव येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,
आव्हाणे बु :त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुल शेवगांव येथील भव्य परेड ग्राऊंडवर भारतीय स्वातंत्र्य दिन कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्षा तथा मॅनेजिंग डायरेक्टर ॲड सौ. स्नेहलदिदी घाडगेपाटील - चव्हाणपाटील या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री. दिनेश लव्हाट पाटील, नगरसेवक सागरभाऊ फडके पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीपराव भागवत,जालना जिल्हा क्रिकेट प्रशिक्षक व अक्षरगणेश चित्रकार श्री. परिमल पेडगावकर सर,माजी प्राचार्य श्री. अशोकराव सोनवणे सर, भाऊसाहेब भुसे गुरूजी,पालक प्रतिनिधी सर्वश्री अशोक उगलमुगले साहेब, बाबासाहेब सोनूमकर, नितीन अकोलकर, गणेश भिसे, दादासाहेब भिसे, उद्धव शेजुळ, सुभाष बारेला,संजय पावरा, दिगंबर मेंगाळ, विजय तिखे,ताई कांबळे, सरस्वती सुर्यवंशी,सुरेखा वसावे, पत्रकार सुरेश पाटील, संकुलाचे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे सर, प्राचार्य श्री श्रीमंत काळे सर, प्राचार्या श्रीमती सरिता जगताप मॅडम, भाऊसाहेब शिंदे आदी पालक उपस्थित होते..
प्रारंभी अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. प्रभु दत्त व कै. संत हरिभाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन द्विपप्रज्वलन करून अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रगीत व ध्वजगीत गायनाने कार्यक्रमास सुरवात झाली..
त्रिमुर्ती संकुलाचे मुख्य आकर्षण बालसैनिक व बालसैनिका यांचे भव्य दिव्य शिस्तबद्ध परेड संचलन झाले. तसेच माजी सैनिक मोहन मरकड व माजी सैनिक तुकाराम धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्चपास ड्रिल डेमो, जिमनॅस्टिक डेमो,कराटे मास्टर प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे डेमो सचिन नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हाॅर्सरायडींग व रेसिंग डेमोंनी उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी बालसैनिक बालसैनिका यांनी देशभक्ती पर नृत्य, गायन तसेच मनोगते व्यक्त केली. तसेच संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी श्री साहेबरावजी घाडगेपाटील यांच्या अभिष्टचिंतन निमित्त तिरंगी क्रिकेट मालिका, कबड्डी, खो - खो, मैदानी खेळ तसेच वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, सुंदर हस्ताक्षर आदी विविध स्पर्धा परीक्षा, 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त तसेच भव्य मॅरेथॉन स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या बालसैनिक व बालसैनिका यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख, सन्मान चिन्ह, मेडल व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी अशोक उगलमुगले साहेब, भाजपा नेते दिनेश लव्हाट पाटील यांनी आपल्या मनोगतात संकुलाचे कौतुक केले. संकुलाचे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे यांनी उपस्थित सर्व पालकांना संकुलाच्या सोयी सुविधा दिनचर्या, त्रिमूर्ती पॅटर्न व आपल्या पाल्यांच्या बौद्धीक, शारीरिक व सामाजिक अर्थात सर्वांगीण विकासासाठी त्रिमूर्तीचा सक्षम स्टाफ कटिबद्ध आहे. अध्यक्षीय भाषणात ॲड. स्नेहलदिदी घाडगेपाटील - चव्हाण पाटील यांनी सैनिकी वसतिगृहयुक्त त्रिमुर्तीच्या संकुलातील सर्व बालसैनिक व बालसैनिका यांना घडविण्याचे मुख्य केंद्र आहे.याकरिता आमचा स्टाफ अहोरात्र मेहनत घेत आहे.पालकांनी जो त्रिमुर्तीवर विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाणार नाही असे पालकांना अश्वासीत करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री श्रीमंत काळे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. ज्ञानेश्वर खरड व मनिषा गटणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. गणेश चितळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख, कमेटी प्रमुख, प्राध्यापक शिक्षक शिक्षिका,सेवक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने राज्यातील विविध जिल्ह्यांतून पालक बंधू, भगिनी, माजी विद्यार्थी, बालसैनिक बालसैनिका उपस्थित होते.व पालक मेळावा पार पडला. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता
झाली.