चाइल्ड इंग्लिश करियर स्कूल सलबतपूर् मध्ये वृक्षारोपण. अशा अनेक उपक्रमांनी परिसरात शाळेवर कौतुकाचा वर्षाव.
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये इयत्ता अकरावी सायन्स शाखेच्या वर्गाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशीत विद्यार्थी ,विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करून पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. वृक्ष हे निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे.संपूर्ण सजीव सृष्टीला संतुलित ठेवण्याचे आणि निसर्गचक्राला योग्य चालना देण्यासाठी वृक्ष महत्वाची भूमिका बजावतात.असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी केले.आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी अल्पावधीत नावारूपास आलेल्या चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सायन्स शाखेच्या सुरुवात करण्यात आली. गुणवत्तेबरोबरच शिस्त,संस्कार,संस्कृती जपणारी शाळा अशा शाळेचा लौकिक असल्याने अनेक विद्यार्थी अकरावी,बारावी सायन्स शाखेसाठी प्रवेशित होत असल्याची माहिती श्री.सागर बनसोडे यांनी दिली. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर यांचेसह शिक्षक,पालक व शिक्षकेत्त र कर्मचारी उपस्थित होते.