येशू _येशू _फेम पाद्री बजिंदर सिंगला लैंगिक अत्याचार प्रकरणी....? मोठी अपडेट.

येशू. येशू. फेम पाद्री बजिंदर सिंगला लैंगिक अत्याचार प्रकरणी....? मोठी अपडेट.
प्रतिनिधी_प्रसाद_घोगरे_९३७०३२८९४४.
सविस्तर_येशू येशू फेम पाद्री बजिंदर सिंग याला लैंगिक अत्याचार प्रकरणी मोहाली पंजाब कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्याच्या शिक्षेची घोषणा १ एप्रिल २०२५ पासून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर प्रकरण हे २०१८ पूर्वीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
हकीगत_ पाद्री बजिंदर सिंग याने २०१८ साली एका ३५ वर्ष वयाच्या महिलेशी जवळीक वाढवून, विश्वास संपादन करून, सदरील पिडीत महीलेच्या राहत्या घरी अत्याचार केला होता, तसेच त्या अत्याचाराची व्हिडिओ बनवून सिंग त्या महिलेला ब्लकमैल करत असल्याचे सदरील पिडीत महिलेने पोलिसांना सांगितले होते, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाद्री बजिंदर सिंग, परदेशात पळून जात असताना त्याला, दिल्ली विमानतळ येथून अटक केली होती. त्याच गून्हाच्या अनुशंगाने पोलिसांनी तपास करून पुरावे कोर्टात सादर केले होते, त्यानुसार पंजाब मोहाली कोर्टाने पाद्री बजिंदर सिंगला लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवले आहे, त्याच्या शिक्षेची घोषणा १ एप्रिल २०२५ पासून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.