अहिल्यानगर येथील पोलिस पथकाने दि. २३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील कोल्हार येथील एका हॉटेलवर छापा

अहिल्यानगर येथील पोलिस पथकाने दि. २३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील कोल्हार येथील एका हॉटेलवर छापा

राहुरी ता प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे : राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील कोल्हार गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल न्यू प्रसाद येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे खबर पोलिस पथकाला लागली होती. त्यानुसार अहिल्यानगर येथील पोलीस निरीक्षक हमीद शेख, सहाय्यक फौजदार शकील अहमद शेख, महिला पोलीस कर्मचारी अर्चना काळे, अनिता पवार, छाया राधवंन, शितल माळी, रजनी भिंगारदिवे तसेच चालक सोन्याबापू काळे आदि पोलिस पथकाने दि. २३ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हॉटेल न्यू प्रसाद येथे छापा टाकला. तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री झाल्या नंतर पोलिस पथकाने हॉटेलची झडती घेतली. त्या ठिकाणी दोन पर प्रांतीय महिला आढळून आल्या. हॉटेल मालक त्यांच्याकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे समजले.

कारवाई करताना दोन महिला व हॉटेल मालकाचा मुलगा पसार झाला. पोलिस पथकाने दोन पर प्रांतीय महिलांची सुटका केली. तसेच वेश्या व्यवसाय चालवीणारा हॉटेलचा मालक वसंत रघुनाथ लोंढे, वय ६० वर्षे, हॉटेल मॅनेजर प्रसाद वसंत लोंढे, दोघे रा. कोल्हार, ता. राहुरी तसेच दलालीचे काम करणारा हरिष विनायक जाधव, वय ५५ वर्षे रा. डांगसैंदानी, ता. सटाणा, जि. नाशिक या तिघांवर राहुरी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अर्चना रामभाऊ काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. २६३/२०२६ स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

         या कारवाई दरम्यान दोन महिला व प्रसाद वसंत लोंढे हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून पथकाकडून त्याचा शोध सुरु आहे. पथकाने हॉटेलमधून मोबाईल व रोख रक्कम असा ४८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.