महंत रमेशानंदगिरीजी यांचे शुभ हस्ते पार पडले होमगार्डचे ध्वजारोहण.

महंत रमेशानंदगिरीजी यांचे शुभ हस्ते पार पडले होमगार्डचे ध्वजारोहण.

 नेवासा (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठिकठिकाणी 15 ऑगस्ट चा जल्लोष साजरा करत असताना नेवासा येथील होमगार्ड कार्यालयामध्ये श्रीक्षेत्रत्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशनंद गिरीजी यांनी ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारली यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे हे प्रमुख पाहुणे उपस्थितीत होते.

 

  नेवासा पथकाचे समादेशक अधिकारी बाळासाहेब देवखिळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत 

 

करून,पथकाच्या कार्याची माहिती सादर केली.

  ध्वजारोहणानंतर अध्यक्षपदावरून बोलताना महंत म्हणाले की , कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांसंबरोबर नेवासा होमगार्डचे जवान बंदोबस्तासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. राजकीय कार्यक्रम असो धार्मिक कार्यक्रम असो, परीक्षा बंदोबस्त असो या ठिकाणी हा जवान इमाने इतबारे काम करताना दिसत आहे. या पथकाची शिस्त आणि कार्य अतिशय नवलौकिकपात्रआहे. या पथकाचे कार्य नेहमीच तेजोमय राहील हीच अपेक्षा व्यक्त करतो.

 

 

 पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे म्हणाले की,आमच्या पोलीस स्टेशनचे संख्याबळ व कामाचा व्याप पाहता होमगार्डचे आमच्यासाठी खूप मोठे योगदान आहे.ज्या ठिकाणी पोलीस कमी पडतात त्या ठिकाणी होमगार्ड आमच्या खांद्याला खांदा लावून ड्युटी करत असताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने आपली शरीर संपदा आणि आरोग्य चांगले राहण्याकरिता,प्रत्येकाने दररोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे असे आवाहन केले. यावेळी नेवासा पथकातील होमगार्ड यांची डायल 112 या तातडी सेवेच्या वाहन चालक म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी शेतकरी नेते जाधव अंबादास कोरडे, बालरोगतज्ञ डॉक्टर शिंदे बाळासाहेब भदगले, इंगि प्रदीप आदमाने, मा. सरपंच बाळासाहेब साळुंखे,अशोक डहाळे, मनोज पारखे, गफूर बागवान,डॉ. करण घुले, विठ्ठलराव उंदरे, बाळासाहेब केदारे, रावसाहेब मगर, राजेंद्र मापारी, अमृत फिरोदिया, संदीप बेहळे, विजय दहीवळकार, कृष्णा सोनी,रितेश कराळे,रंजन जाधव, हमीद शेख, पो.पा. दिलीप गायकवाड फलटण नायक अशोक टेमकर, श्रीकांत ससे, दादा कनगरे, लिपिक अल्ताफ शेख, पत्रकार मोहन गायकवाड, गणेश लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते जनसंपर्क अधिकारी सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, मोहन गायकवाड यांनी आभार मानले.