प्रभु रामाच्या नावाने निवडून आल्यावर रामाचेच नाव असलेल्या श्रीरामपूर जिल्हयाला विरोध का ?
किशोर भगत
काल शिर्डी या ठिकाणी अतिरीक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा होताच श्रीरामपूर शहरात प्रचंड असंतोषाची लाट उमटली . चौका चौकात एकच चर्चा सुरू झाली आणी सर्व स्तरातुन याबाबत नाराजीचा सुर ऐकायला येतोय . गेल्या 3O वर्षापासुन मा आ जयंतरावजी ससाणे यांच्या पुढाकारातुन श्रीरामपूरच्या जनतेने जिल्हयाचे स्वप्न पाहिले आणी ते सत्यात उतरवण्यासाठी ससाणे साहेबांनी अनेक प्रयत्न करत अनेक शासकिय कार्यालय श्रीरामपूर येथे आणली . श्रीरामपूर जिल्हा झाल्यास मोठ मोठी शासकिय कार्यालये , मोठे उद्योग धंदे या ठिकाणी येवून श्रीरामपूराचा विकास होईल असा आशावाद या मागे होता . जिल्हयाच्या ठिकाणी ग्रामीण भागातुन कामासाठी , खरेदीसाठी किंवा व्यापारासाठी सामान्य माणूस येवून व्यापार पेठेमध्ये नवचैतन्य येईल व दूर नगर पर्यंत जाण्यापेक्षा अकोले , संगमनेर ;कोपरगाव राहाता , राहूरी व नेवासा या तालुक्याना मध्यवर्ती ठिकाण म्हणून श्रीरामपूर जिल्हाच योग्य होता .
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्षेत्र आहे. तेथे राज्यासह देश-विदेशातून भक्तगण गर्दी करतात. वर्षभर सण उत्सव चालूच असतात. त्यातच वारंवार राज्य आणि केंद्रीय मंत्रीमंडळ सदस्यांची नेहमीच वर्दळ असते. यामुळे प्रशासनाची नेहमीच धांदल उडते. त्यातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत झाल्यास सर्वसामान्य जनतेकडं लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ मिळणार नाही. याकरिता जिल्ह्याचे ठिकाण म्हणून श्रीरामपूरच योग्य आहे.
सध्याच्या सरकारमध्ये प्रभू रामाचे अनेक भक्त मंत्रीमंडळात आहेत व त्यांनी औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर व अहमदनगरचे अहिल्या नगर करण्याचे अतिशय स्तुत्य पावले उचलली ज्यामुळे या सरकारचे सर्वत्र समर्थन झाले परंतु ज्या शहराच्या नावातच राम आहे व ज्या शहरामध्ये जिल्हा होण्यासाठीच्या सर्व पात्रता आहे अश्या शहरावर अन्याय का ? याच विषयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे .
जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे यांनी या वृताचा जाहिर निषेध करून श्रीरामपूर लाच जिल्हा घोषित करावे असे आवाहन केले आहे . त्याचप्रमाणे गुरुवार दि.१५ जून २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता मेनरोडवरील महात्मा गांधी पुतळ्याला हार घालून निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व पक्षाचे प्रतिनिंधीनीं यावे असे आवाहन सामाजिक भावनेतून श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले आहे. तसेच श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी हिच वेळ आहे , सर्व श्रीरामपुरकरांनी पक्ष-संघटना,गट-तट,हेवेदावे सोडुन एकत्र येण्याची वेळ आहे यासाठी सर्व पक्षीय नेते , कार्यकर्ते , सर्व संघटना , सर्व मंडळ , सर्व व्यापारी यांच्या वतीने
शनिवार 17 जून 2023 रोजी श्रीरामपूर बंद
पाळून सहकार्य करावे असे आवाहन
श्रीरामपूर मर्चन्ट असो श्रीरामपूर पदाधीकारी व संचालकं मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे .