सोनई मध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी नाभिक संघटना व जिवाजी महाले प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

सोनई मध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी नाभिक संघटना व जिवाजी महाले प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद

सोनई, ता. २४ः संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आज नाभिक संघटना व जिवाजी महाले युवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त फुलांनी सजवलेल्या रथातून संत सेना महाराज प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पंढरीनाथ महाराज तांदळे यांनी रथाचे स्वारथ्य केले.

 

जिल्हा परिषदेचे सभापती सुनील गडाख आणि मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या हस्ते संत सेना महाराजांचे प्रतिमापूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळी प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलाने संत सेना महाराज मंदीरात मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. मिरवणूक संत सेना महाराज मंदीर, माधवबाबा चौक, सोनई पेठ, मारूती मंदीर, शिवाजी चौक मार्गे काढण्यात आली. भगव्या साड्या परिधान करून डोक्यावर कलश घेत नाभिक समाजातील महिला व भगिनींनी जागोजागी फुगड्या खेळत मिरवणुकीत रंगत आणली. पंढरीनाथ महाराज तांदळे यांच्या प्रवचनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तात्यासाहेब कोरडे, पत्रकार अविनाश राऊत, सचिन वाघमारे, माधव कदम, पोपट शिंदे, नंदकिशोर आौटी, श्रीराम दळवी आदींनी मिरवणुकीचे नियोजन केले. 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन वाघमारे, दत्तात्रय बिडे, अतुल राऊत, वैभव वाघमारे, अमोल कोरडे, ऋषिकेश कोरडे, प्रवीण कदम, महेश वाघमारे, काकासाहेब कोरडे आदींनी परिश्रम घेतले. सोनई व परिसरातील नाभिक बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.