घिसाडी समाजातील उत्तम कारागीर कै. राजु पवार हरपल्याणे बालाजी देडगावकर हळहळले.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील घिसाडी समाजातील राजू पवार एक उत्तम ,हूनहार कारागीर हरपल्याने पवार कुटुंबीय व संपूर्ण देडगाव करात दुःखाचे वातावरण निर्माण झाले.
अतिशय प्रामाणिक व सालस असणारं व्यक्तिमत्त्व कौटुंबिक प्रपंचाचा गाडा ओढत असताना काही दिवसांपूर्वी जणू काही त्यांच्या घराला नजर लागली व अचानक एका मोठ्या आजारानं ग्रासलं व काही दिवसातच मानला चटका लावणारी घटना घडली. व त्यांनी त्यांच्या गंगापूर येथिल नातेवाईक कडे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देडगाव व गंगापूर परिसर हळहळला.
त्यांच्या पाठीमागे आई, भाऊ, पत्नी, मुली, जावई व नातेवाईक व मोठा मित्र परिवार आहे.