वाघोली येथे शासकिय हमीभाव हरभरा खरेदीस शेतकऱ्यांच्या उपस्थितित प्रारंभ .
वाघोली येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदीस शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे नाफेड व महा.एफ. पिसी. अंतर्गत श्री दत्तकृपा कृषी प्रोड्युसर कंपनी मार्फत शासकीय हमीभाव प्रमाणे हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ कृषी पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय बुचकुल साहेब याच्या शुभहस्ते करण्यात आला. नाफेड व महा. एफ. पि सी. अंतर्गत शासकीय हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी कृषी प्रोड्युसर कंपन्यांना आदेश प्राप्त झाले आहेत. वाघोली येथील श्री दत्तकृपा कृषी प्रोड्युसर कंपनी तर्फे प्रत्यक्ष हरभरा खरेदी करण्यास सुरवात झाली. यावेळी काकासाहेब पोटफोडे, पांडुरंग दातीर, देवदान आल्हाट, सूर्यकांत शेळके, महेश दातीर आदींसह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कंपनीतर्फे गेल्या अनेक वर्षपासून हमीभाव खरेदी योजना, किंमत स्थिरीकरण योजना (कांदाखरेदी )राबवून शेतकऱ्याचा विश्वास संपादित केला असून, परिसरातील शेतकरी बांधवानी शासकीय हमीभाव हरभरा खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे कार्यकारी संचालक श्री.अशोक दातीर सर यांनी केले.