राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाच्या वतीने प्रमोद गजभार यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान.

राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाच्या वतीने प्रमोद गजभार यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान.

*राष्ट्रीय लोकराज्य न्यूज च्या वतीने प्रमोद गजभार यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान.*

 तालुका (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील कौठा येथील लोकनियुक्त सरपंच प्रमोद त्रिंबक गजभार यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया च्या वतीने सोलापूर येथे घेण्यात आलेल्या सोहळ्यात राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान झाला. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते फेटा ,शॉल ने सन्मानित करत सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

    राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया चॅनल हे सबंध महाराष्ट्रभर काम करत असून निर्भीडपणे बातम्यांचे वृत्तांकन करत असून नामांकित असं चॅनल असल्याने या यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे पुरस्कार जाहीर होत असतात . याही वर्षी अनेक पुरस्कार जाहीर झाले असून ,यामध्ये आपल्या सरपंच , ग्रामपंचायत क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय सामाजिक कार्य केल्याने व समाजासाठी निरंतर काम केल्याबद्दल सर्वसामान्य वंचित ,दिन ,दुबळ्याला न्यायची भूमिका देऊन एक कौठा या गावाला आदर्श गाव बनवण्याचं स्वप्न बाळगून त्या दिशेने विकास करण्याचं काम होत आहे. आणि म्हणूनच नेवासा तालुक्यातील सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद गजभार यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया च्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेत आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 यावेळी सरपंच प्रमोद गजभार बोलताना म्हणाले की ,हा गौरव माझा नसून सर्व ग्रामस्थांचा आहे. मी गावामुळेच आहे. म्हणून मी ग्रामस्थाचा कायम ऋणी राहून असेच विकासाचे कार्य करीत राहील व गाव एक आदर्श मॉडेल बनवेल व गावाला योग्य दिशा देण्याचे काम करील अशी आहे. ग्वाही देत आपले मनोगत व्यक्त केले.

   या सोहळ्याप्रसंगी उपस्थित मुख्य संपादक राहुल कुदनर , संपादक,पत्रकार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे गुणगौरव पुरस्कारित मान्यवर व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.