वाळू तस्करांविरोधात शेवगाव व कोपरगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई .

वाळू तस्करांविरोधात शेवगाव व कोपरगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई .

*शेवगाव व कोपरगाव येथील वाळु तस्कराविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई* 

*छाप्यात 22,55,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त*

 

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकीविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पो.नि. संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार भगवान सानप, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, महादेव भांड, अरूण गांगुर्डे, अभिजीत अरकल, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव अशांचे दोन पथक तयार करून अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले. 

 

  दिनांक 21/10/2026 व दिनांक 22/10/2026 रोजी पथकाने शेवगाव व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढुन 02 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 02 गुन्हे दाखल करून एकुण 22,55,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

या कारवाई दरम्यान वैजीनाथ काळे, विठ्ठल गव्हाणे रा. मुंगी ( शेवगाव ) यांचेवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विठ्ठल गव्हाणे हा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे . दुसऱ्या कारवाईत अनिल गायकवाड व सोनू पाले (कोपरगाव ) यांचेवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील सोनू पाले हा फरार झाला आहे .

 

वरील कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.